क्राईम

ज्या हॉटेलमध्ये जेवले, त्याच हॉटेलमालकाच्या जीवावर उठले, कारण काय तर…

माजलगाव शहरा पासुन ४ किमी अंतरावर नागडगाव पाटी कॉनर्र वर गावरान ढाबा आहे. महादेव गायकवाड हे त्याच ढाब्याचे मालक. काल संध्याकाळी 7.30 च्या सुमारास माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील ग्राहक ढाब्यावर जेवायला आले होते. पण... बीडच्या मस्साजोगमधील सरपंचांची झालेली निर्घृण हत्या, गेल्या 4 महिन्यांपासून गाजत्ये. संतोष देशमुखांचा गेलेला बळी यावरून सध्या राज्यातील वातावरण प्रचंड तापलेलं आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी बीडच्या माजलगावमध्ये भाजप पदाधिकारी बाबासाहेब आगे यांचीही कोयत्याने सपासप वार करून हत्या झाली. त्याची दहशत अद्याप कायम असतानाच आता बीडच्या माजलगावमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार रंगला आहे. ज्या हॉटेलमध्ये बसले, पोटभरून जेवले, त्याच हॉटेलचे बील देण्यावरून झालेल्या वादात हॉटेलमालक आणि त्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या धक्कादायक प्रकारानंतर दोघावंरही रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र दुर्दैवाने यामध्ये जखमी बापलेकांपैकी, वडिलांचा मृत्यू झाला. रुग्णालयातच महेश गायकवाड यांनी अखेरचा श्वास घेतला असून या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.