क्रीडा

IPL 2025 नंतर संन्यास ? धोनीचं स्पष्ट उत्तर, मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर मोठं वक्तव्य

आयपीएल 2025 च्या 38 व्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्जला 9 विकेट्सनी हरवलं. मॅचनंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने जे वक्तव्य केलं, त्याने सर्व जण हबकलेच. इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 38 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून मुंबई इंडियन्सने विजयाची हॅटट्रिक नोंदवली. या विजयासह, मुंबई इंडियन्सचा संघ हा 8 सामन्यांत 4 विजय आणि 4 पराभवांसह पॉइंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्जचा संघ एवढ्याच मॅचेस खेळला सला तरी फक्त 2 विजयांसह पॉइंट टेबलमध्ये अगदी तळाशी आहे. मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रोहित शर्मा हा चेन्नईविरुद्धच्या विजयाचा नायक होता, ज्याने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याला सूर्यकुमार यादवने चांगली साथ दिली. मात्र या ,सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने असे काही धक्कादायक वक्तव्य केलं, जे ऐकून सर्वच हबकले.